दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सातारा नगर परिषदेमार्फत ऑगस्ट 2022 मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सातवांतर्गत 1 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत सातारा नगर परिषद हद्दीतील पूर्ण घरपट्टी भरणाऱ्या व्यक्तींना हर घर तिरंगा अभियानांतर्गत मोफत तिरंगा वाटप करण्यात येणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत 28 जुलै 2022 रोजी वाहन रॅली व प्रभात फेरीचे आयोजन. तसेच हुतात्मा स्मारकाचे रंगकाम व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व शासकीय इमारतींवर भारताचा राष्ट्रध्वज फडविण्यात येणार आहे. 28 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
हर घर तिरंगा अभियानांतर्गत होर्डीग, घंटागाडी, फेसबुक, सातारा नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर समाज माध्यमांद्वारे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत समाज प्रबोधन करण्यात येणार आहे. सातारा नगर परिषदेच्या मालकीच्या संस्था, खुल्या जागा, डोंगर या ठिकाणी वृक्षारोपण व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियानाचे फायबर लोगो शहरामध्ये विविध ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.