काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन : माजी नगरसेवक अशोकराव जाधव


दैनिक स्थैर्य | दि. ०३ ऑक्टोबर २०२४ | फलटण | मलठण येथील काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी श्री दुर्गामातेची स्थापना हि जल्लोषात होणार आहे. गुरुवार दि. ०३ रोजी दुपारी १२ वाजता श्री दुर्गामातेची प्रतिष्ठपणा करण्यात येणार आहे. यावेळी नवरात्र उत्सव असल्याने घटस्थापना करण्यात येणार असल्याची माहिती हि माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिली.

काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने संगीत खुर्ची, चित्र कला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हास्य नगरी, भारुड, तसेच दांडिया अश्या विविध स्पर्धांचे आयोजन हे करण्यात आले आहे. खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ह्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!