दैनिक स्थैर्य । दि. २० मार्च २०२३ । सातारा । रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी
रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ सौ.वहिनी यांचा ९३ वा पुण्यतिथी कार्यक्रम संस्थेच्या सातारा शहरातील सर्व स्थानिक शाखांच्या वतीने मंगळवार दिनांक २१ मार्च २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता श्री.छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस शाखा नंबर १ धनीणीची बाग सातारा येथे आयोजित केला आहे. संस्थेचे चेअरमन मा. डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख मा.प्रा.डॉ.प्रकाश पवार हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ‘रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन व कार्य’ या विषयावर ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.या प्रसंगी प्रा.संभाजी पाटील यांनी सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील वसतिगृहातील विद्यार्थिनीचा तयार केलेला ‘कर्मवीर वाद्यवृंद’ हा पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम सादर करणार आहे. तरी या कार्यक्रमास सातारा शहरातील शिक्षणप्रेमी,ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी केले आहे.