नवीन उद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्ट-अप वीकद्वारे १५ लाख पर्यंतचे कार्यादेश १५ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । राज्यात नावीन्यपूर्ण कल्पनांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने महाराष्ट्र स्टार्ट-अप वीकचे आयोजन केले आहे.  शिक्षण कौशल्य, आरोग्य सेवा, शुध्द उर्जा, पर्यावरण, पाणी व कचरा नियोजन, स्मार्ट पायाभूत सुविधा व गतिशीलता, शासन व अशा विविध क्षेत्रांशी निगडीत स्टार्ट-अप्स या संधीसाठी अर्ज करु शकतात. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी प्रथम 100  स्टार्ट अप्सची निवड करुन त्यांना या आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमामध्ये आपल्या नानिन्यपूर्ण कल्पना शासन, उद्योजक, शिक्षण आणि गुंतवणूकदारांच्या समोर मांडण्याचे व्यासपीठ मिळेल. निवड झालेल्या 100 नवीन उद्योजकांपैकी 24 उत्कृष्ट स्टार्ट-अप्सची विजेते म्हणून निवड करण्यात येऊन आपल्या कल्पना शासनाच्या विविध विभागांमध्ये अमलात आणण्याकरिता रु. 15 लाखांपर्यंतचे कार्यादेश देण्यात येईल.

नवीन उद्योजकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी http://msins.in/startup-week या पोर्टलवर भैट देऊन नोंदणी करावी. नोंदणी कण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 असून नवीन उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!