
दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । सातारा । महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 17 जून 2022 रोजी जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. याचा निवृत्तीधाकरकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या पेन्शन अदालतीस प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी ) अधिकारी निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्कदारी ) कार्यालयाने पेन्शनरांच्या सोईकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत. जसे साप्ताहिक ऑनलाईन पेन्शन संवाद,24 तास उपलब्ध टोल फ्री नं. -1800 -220014 / 24*7 व्हॉईस मे नं. 020-71177775 माहिती वाहिनी, पेन्शन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, पेन्शनर्स करीता समर्पित ई-मेल helpdesk.mh1.ae@cag.gov.in या उपक्रमाची माहिती देण्यात येईल.