कृषिकन्येकडून एकात्मिक तणनियंत्रण प्रात्यक्षिकाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण ।  महात्मा फुले कषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, धुळे येथील कृषिकन्या कु.तनुजा संजय काळे यांनी कापशी (ता.फलटण) येथील शेतकर्‍यांना एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीविषयी माहिती दिली.

रोग- कीड यांच्याव्यतिरिक्त तणांच्या प्रादुर्भावामुळे पीक उत्पादनात मोठी घट येते. पीकवाढीच्या काळात तण पिकासोबत अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी स्पर्धा करते. त्यामुळे तण व्यवस्थापन करणे गरजेचे असते असे सांगून शेतकर्‍यांना तणनियंत्रणाच्या पद्धती, तण नियंत्रणाच्यावेळी घ्यावयाची काळजी याविषयी कु.तनुजा काळे यांनी मार्गदर्शन केले.

सदर उपक्रमांसाठी कु.तनुजा काळे यांना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.डी.देवकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.संदीप पाटील, कार्यक्रम अधिकारी ए.एस. महाले व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!