स्थैर्य, सातारा दि.7 : येथील प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आणि प्रकृती जियो फ्रेश यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ऑनलाईन योगा वर्ग आणि स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दि. 11 जून ते 20 जून या कालावधीत सर्व वयोगटांसाठी खुला योग वर्ग आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये वयवर्ष 8 ते 14, 15 ते 25, 26 ते 40, 41 ते 55, आणि 55 पुढील असे वयानुसार गट करण्यात आले आहेत.
या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणार्यांनी अधिक माहितीसाठी प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट यांच्याशी 8623052643 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.