वाखरीच्या कोवीड मदत कक्षाकडून आशा, अंगणवाडी सेविकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.7 : कोरोना काळात गरजूंना मदत करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या वाखरी (ता.फलटण) येथील कोवीड मदत कक्षास शरद ढेकळे यांनी सामाजिक जाणीवेतून 500 मास्क व सॅनिटायझर मदत स्वरुपात दिले होते. कोवीड मदत कक्षाकडून यातील 300 मास्क आणि 10 लिटर सॅनिटायझरचे वाटप घरोघरी जावून काँटेक्ट ट्रेसिंगचे काम करणार्‍या आशा व अंगणवाडी सेविकांना करण्यात आले.

तसेच गावातील गरड आळी व तुकाराम मंदीर परिसरातील नागरिकांनाही कोवीड मदत कक्षाच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!