जागतिक तापमान वाढीमुळे होणारे हवामानातील बदल व त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सातारा जिल्हा बँकेत परिसंवादाचे आयोजन !

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या आर्थिक व सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारांत घेवून अनेकविध योजना राबविल्या आहेत. यामुळे जिल्हयातील शहरी व ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी, सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणेस मदत झालेली आहे .

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, यांचे सयुंक्त विद्यमाने रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात परिसंवाद आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या कार्यक्रमास सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे उपसभापती ना. नीलमताई गोरे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, सिने अभिनेती व पर्यावरण कार्यकर्त्या मृण्मयी देशपांडे यांची प्रमुख उपस्थित असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव सौ. मनीषा म्हैसकर, सिने अभिनेते अमीर खान, सयाजी शिंदे ऑनलाईन उपस्थित रहाणार आहेत.

या परिसंवादास पर्यावरण तज्ञ खा. वंदनाताई चव्हाण, कामधेनु विद्यापीठ गांधीनगरचे कुलगुरू मदनगोपाल वार्ष्णेय, डॉ. गुरुदास नूलकर, डॉ. अविनाश पोळ आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन प्रदर्शित केला जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात तसेच तालुक्याच्या ठिकाणी बँकेच्या विभागीय कार्यालयात किंवा समाज माध्यमांवर ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, तसेच सर्व संचालक मंडळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!