फलटण तालुक्यातील रेशनकार्डधारकांसाठी १८ एप्रिल रोजी शासकीय जत्रांतर्गत शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत पुरवठा विभागातील रेशन कार्डांच्या दुरूस्ती, बदलासाठी फलटण तहसील कार्यालयाच्या दरबार हॉलमध्ये दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी दिली.

पुरवठा विभागातील या रेशनकार्ड शिबिराअंतर्गत खराब, जीर्ण, गहाळ शिधापत्रिका बदलून देणे, शिधापत्रिकेतील नावे कमी करणे, शिधापत्रिकेत नाव समाविष्ठ करणे इ. कामकाज करण्यात येणार आहे.

या शिबिरात दुबार शिधापत्रिका बनविण्यासाठी अर्ज, तलाठी यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, रेशन दुकान दाखला, मूळ रेशनकार्ड, मूळ रेशनकार्ड हरविले असल्यास पोलीस स्टेशनचा दाखला, प्रतिज्ञापत्र (साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र) गहाळ झाले असल्यास, कुटुंबातील सर्व सदस्यांची आधारकार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

शिधापत्रिकेमधील नाव कमी करण्यासाठी अर्ज, मृत्यू दाखला, लग्नपत्रिका (मुलीचे लग्न झाले असल्यास) ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविण्यासाठी अर्ज, जन्मदाखला / बोनाफाईड, नाव कमी केल्याचा दाखला (लग्न होऊन आल्यास), लग्नपत्रिका ही कागदपत्रे लागतील.

शिधापत्रिकेमधील नाव दुरूस्ती करण्यासाठी अर्ज, प्रतिज्ञापत्र, नावाचा पुरावा, गॅझटे ही कागदपत्रे आवश्यक आहेत, अशी माहिती फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी दिली.

फलटण तालुक्यातील रेशनकार्ड धारकांनी या शासकीय जत्रांतर्गत पुरवठा विभागाच्या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार समीर यादव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!