फलटणमध्ये (SVEEP) अंतर्गत मतदारांमध्ये मतदान जनजागृती महारॅलीचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२४ | फलटण |
भारत निवडणूक आयोग मार्फत (SVEEP) कार्यक्रम अंतर्गत मतदार जनजागृती कार्यकम अनुषंगाने ४३ माढा लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता तहसीलदार कार्यालय, फलटण येथून रॅलीला सुरूवात करून फलटण शहरात प्रभात फेरी व रॅली काढण्यात येणार आहे. फलटणमध्ये या मतदान जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांमध्ये मतदान करणेबाबत जनजागृती करणे, हा मुख्य उद्देश आहे. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, फलटण शहरातीत BLO, तसेच BLO, पर्यवेक्षक उपस्थित राहणार आहेत.

मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देणे, मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, हा उद्देश या रॅलीचा आहे. यावेळी मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, व्याख्यान, प्रतिज्ञा असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ४३ माढा लोकसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले, तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

SVEEP कार्यक्रमाचे नियोजन एस. के. कुंभार सहा. गटविकास अधिकारी फलटण SVEEP पथकप्रमुख, श्री. सचिन जाधव, कृषि सहायक SVEEP सहाय्यक अधिकारी फलटण यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!