माळजाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यकम्रांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. 5 आक्टोंबर 2024 । फलटण । येथील लायन्सक्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यकम्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी फलटणकर नागरिकांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष लायन प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.

गुरुवार दि. 3 आक्टोंबर रोजी देवीची महाआरती करुन घटस्थापना करण्यात आलेली आहे. दि. 4 आक्टोंबर रोजी विविध गोंधळी ग्रुपच्यावतीने लोककला स्पर्धा संपन्न झाल्या आहेत. दि. 5 आक्टोंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत एैसे रसिका हासविन हा प्रा. शरद इनामदार यांना विनोदी किस्से व कथाकथनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि 6 आक्टोंबर रोजी महाराष्ट्राची लोककला या कार्यक्रमांच्या अंतर्गत सायंकाळी 6 ते 9 यावेळेमध्ये पोवाडे, भारुड, गोंधळ, वासुदेव व आराधी गितांचा भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दि. 7 आक्टोंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये ओपन दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या प्रथम क्रमांकास सोन्याची ठुशी व नेकलेस, द्वितीय क्रमांकास चांदीचा छल्ला तर तृतीय क्रमांकास मानाची पैठणीसाडी वितरित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येकास सन्मानचिन्हे व उत्तेजनार्थ बक्षीसे वितरित करण्यात येणार आहेत. दि. 8 आक्टोंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये महिला व पुरुषांची भजन स्पर्धा संपन्न होणार आहे.

बुधवार दि. 9 आक्टोंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 यावेळेमध्ये महिलांसाठी होममिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 10 आक्टोंबर रोजी प्राचार्य मधुकर कोथमिरे यांचे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत त्यागात सर्व सुखम या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. दि. 11 आक्टोंबर रोजी सायंंकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये नवमीनिमित्त महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे तर शनिवार दि. 12 आक्टोंबर रोजी विजयादशमी आर्थात दसर्‍याच्या निमित्ताने सायंकाळी 5 वाजल्यापासून पारंपारिक दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती फलटणच्यावतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पुणे येथील पु.ना. गाडगीळ, चंदुकाका सराफ, के.बी. एक्सपोर्ट, गॅलॅक्सी पतसंस्था, वेदांत टेक्सास्टाईलस यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

तरी नवरात्र व दसरा महोत्सवाच्या निमित्ताने फलटण शहर व तालुक्यातील महिलांनी, नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष ला. प्रमोद निंबाळकर, सचिव ला. विजय पाटील, खजिनदार ला. महेश गरवालिया, सहसचिव ला. रणजित बर्गे, सहखजीनदार ला. प्रितम शिंदे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!