
दैनिक स्थैर्य । दि. २० नोव्हेंबर २०२२ । फलटण । तरडगाव येथे फलटण एज्यु केशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय,फलटण यांच्या वतीने फलटण तालुक्यातील तरडगाव गावात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती अर्थातच बाल दिनानिमित्त गावातील जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरडगाव येथील बालदिन उत्साहात संपन्न झाला.

यामध्ये खेळ,मुलांचे भाषण आणि खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका पी.डी.घाडगे उपस्थित होत्या.
कृषी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ.सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.नीलिमा धालपे,कार्यक्रम अधिकारी प्रा.स्वप्नील लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत गणेश पवार ,ओंकार रांधवन ,पंकज सरक ,महेश शिंदे ,मानस शिंदे ,अजिंक्य सूळ ,शुभम वायसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषिदूतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.