दैनिक स्थैर्य | दि. 13 जानेवारी 2024 | फलटण | येथील योगीराज प. पू. श्री. सद्गुरु दादामहाराज देशपांडे (ग्वाल्हेरकर) यांचा पुण्यतिथी सोहळा रविवार, दि. 21 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, दि. 12 जानेवारी रोजी सकाळी ८.३० वा. प. पू. श्री. डॉ. प्र. ना. दीक्षित यांच्या पवित्र हस्ते संपन्न झाला. या सप्ताह काळात रोज प्रवचन व ‘श्री शिवमहापुराण’ हे कार्यक्रम होतील. रविवार दि. 21 जानेवारी रोजी पहाटे ५.५५ वाजता पुण्यकाळ (गुलाल वाहणे) आहे.
सोमवार दि. 22 जानेवारी रोजी महाप्रसाद होऊन या महोत्सवाची सांगता होईल. दरम्यान श्री शिव महापुराणा कथा महापर्वणी सोमवार दि. 15 जानेवारी ते रविवार दि. 21 जानेवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 7 वाजेपर्यंत श्री शिव महापुराण कथा प्रवक्ते श्री राघवेंद्रबुवा रामदासी यांच्या वाणीतून अभूतपूर्व अध्यात्मिक शिवसेवा रंगणार आहे.
शुक्रवार दि. 12 जानेवारी ह.भ.प.पुष्पाताई कदम, फलटण, शनिवार दि.13 जानेवारी ह. भ. प. धैर्यशिल देशमुख (भाऊ) नातेपुते, ता. माळशिरस, रविवार दि. 14 जानेवारी प्रा. रविंद्र येवले, फलटण यांचे प्रवचन सायं. ५.३० ते ६.३० या वेळेत होणार आहेत.
शुक्रवार दि. 12 जानेवारी ते रविवार दि. 21 जानेवारी पहाटे ५.३० ते ६.३० यावेळी दररोज प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. श्रीग्रंथराज दासबोध पारायण, शुक्रवार दिनांक १२/०१/२०२४ ते रविवार दिनांक २१/०१/२०२४ वेळ सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेस दररोज संपन्न होणार असून सदर पारायणाचे व्यासपीठ – ह.भ.प.सौ. पुष्पाताई कदम ह्या असणार आहेत रविवार दि. २१/०१/२०२४ श्रींचा पुण्यकाळ पहाटे ५.५५ वा. सर्वांनी गुलाल वाहणे व ६ ते ८ पवमान अभिषेक पूजा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवार दि. २१/०१/२०२४ व सोमवार दि. २२/०१/२०२४ भक्तगणांचे अभिषेक पहाटे ५.०० पासून सकाळी ८.०० पर्यंत या कालावधीत होणार आहेत. सोमवार दि. २२/०१/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन- ह.भ.प.श्री. राघवेंद्रबुवा रामदासी यांचे होणार असून तदनंतर नैवेद्य -आरती १२.०० ते १२.३० वाजता संपन्न होणार आहे. महाप्रसाद- १२.३० ते २.०० संपन्न होईल
या पुण्यतिथी समारोहात आपलीही उपस्थिती असावी, असे आवाहन ट्रस्टच्या मार्फत करण्यात आले आहे.