दैनिक स्थैर्य | दि. १२ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांच्या १२५ व्या समाधी सोहळ्यानिमित्त मलठण येथे श्री सद्गुरू हरिबाबा महाराज समाधी मंदिरात दि. १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत श्रीमद् भागवत पुराण कथा, किर्तन, प्रवचन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भागवत कथेस प्रारंभ १२ फेब्रुवारी रोजी होणार असून रोज सकाळी ९ ते ११ श्रीमद भागवत कथा प्रवक्ते ज्ञानेश्वरी कंठस्थ गुरुवर्य माधव महाराज ढाकणे, आळंदी २८ फेब्रुवारीपर्यंत भागवत कथा होणार आहे.
सोहळ्याचा मुख्य दिवस श्री सद्गुरू हरिबाबा महाराज पुण्यतिथी एकादशी मंगळवार, दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ६ ते ८ सांप्रदायिक भजन, सकाळी ९ ते ११ श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते ज्ञानेश्वरी कंठस्थ, गुरुवर्य माधव महाराज ढाकणे आळंदी दुपारी २ ते ४ महिला भजन, सायंकाळी ४.३० ते ६.३० श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ७ ते ९ सांप्रदायिक भजन, रात्री ९ ते ११ सद्गुरू हरिबाबा महाराज सांप्रदायिक भजनी मंडळ यांची भजन सेवा होणार आहे.
सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सद्गुरू हरिबुवा महाराज ट्रस्ट, मलठण यांच्या वतीने करण्यात आले आहे.