दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
जय गणेश फेस्टीव्हल क्रीडा मंडळ, तिरकवाडी (ता. फलटण, जि. सातारा) यांच्याकडून श्री गणेश फेस्टीव्हल २०२४ या गणेश जयंतीनिमित्त तिरकवाडी येथे ‘श्री गणेश केसरी’ भव्य ओपन बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले आहे. ही शर्यत ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सुरू होईल.
मंडळाच्या श्री गणेश फेस्टीव्हलचे हे २६ वे वर्ष असून शर्यतींची प्रवेश फी ७००/- रूपये ठेवली आहे. या शर्यतींसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रथम क्रमांकाच्या बैलगाडीस रूपये ७१,०००/- व श्री गणेश केसरी चषक आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सौजन्याने, द्वितीय बक्षीस रूपये ५१,०००/- व श्री गणेश केसरी चषक श्री. सचिन रणवरे, श्री. विठ्ठल ठोंबरे व मयुर साळुंके यांच्या सौजन्याने, तिसरे बक्षीस रूपये ४१,०००/- व श्री गणेश केसरी चषक श्री. गंगाराम नाळे व सतीश नाळे यांच्या सौजन्याने, चतुर्थ बक्षीस रूपये ३१,०००/- व श्री गणेश केसरी चषक श्री. आनंदराव सोनवलकर यांच्या सौजन्याने, पाचवे बक्षीस रूपये २१,०००/- व श्री गणेश केसरी चषक दुर्गामाता दूध संकलन केंद्र यांच्या सौजन्याने, सहावे बक्षीस रूपये ११,०००/- व श्री गणेश केसरी चषक कै. शरद शहाजी गुंजवटे यांच्या स्मरणार्थ श्री. दत्तात्रय गुंजवटे यांच्या सौजन्याने व सातवे बक्षीस रूपये ७,०००/- व श्री गणेश केसरी चषक राजलक्ष्मी बझार, राजुरी यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे.
श्री गणेश केसरी चषक, सन्मानचिन्ह हे श्री. नानासाहेब काळुखे (उपसरपंच, तिरकवाडी) यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे. या शर्यतींसाठी समालोचक सुनील मोरे व विकास जगदाळे सर असून झेंडा पंच धनावडे बापू कोरेगावकर राहणार आहेत. त्यांचे सौजन्य योगेशशेठ दळवी (युवा उद्योजक, दुधेबावी) हे आहेत. शर्यत अड्डाचे सौजन्य मनमोहन इलेक्ट्रिकल, पुणे यांच्याकडून देण्यात आले आहे.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे.
ऑनलाईन नावनोंदणीसाठी श्रेयस बनकर (मोबा. ८५५१०३८९८९) व वैभव सोनवलकर (मोबा. ९३७०२५०४३२) यांच्याशी संपर्क साधावा.