दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारा व डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रचार प्रसिध्दी, शेतकरी प्रशिक्षणांतर्गत फलटण येथे गुरुवार, दि. ७ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता ‘नैसर्गिक शेती कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे होणार आहे.
या कार्यशाळेस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, तर जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, सातारा सौ. भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा श्री. विकास बंडगर, उपविभागीय कृषी अधिकारी सातारा श्री. सुहास रणसिंग, फलटण तालुका कृषी अधिकारी श्री. गजानन ननावरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यशाळेस अहमदनगरचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ श्री. दीपक नरवडे, कृषीवेद ऑरगेनिक फार्म आसूचे संस्थापक श्री. ताम्हाणे हे मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी फलटण तालुक्यातील व शहरातील शेतकर्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फलटण तालुका कृषी अधिकार्यांनी केले आहे.