दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । सातारा । राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचे शासनाने निश्चित केलल्याचे नमूद केलेले आहे. या सेवा पंधरवड्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा मार्फत मागासवर्गीय विदयार्थ्यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र हे महत्वाचे प्रमाणपत्र असून मागासवर्गीय विद्यार्थी महाविद्यालयामध्ये प्रविष्ट झालेपासून ते त्याचे सर्व महाविद्यालयीन शिक्षणपूर्ण होईपर्यंत व त्यानंतरही शिक्षणबाहय जगतातही जसे नोकरी करिताही त्यांना सदरचे प्रमाणपत्र महत्वपूर्ण दस्ताऐवज आवश्यक ठरतो.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करणेबाबत विशेष मोहिमेचे आयोजन करुन सेवा पंधरवडा कालावधीमध्ये जास्तीत जास्त मागासवर्गीय विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरीत करण्याबाबत जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा व शिक्षणाधिकारी माध्यामिक जिल्हा परिषद सातारा यांनी करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचीत केलेले आहे. त्याअ नुषंगाने मागासवर्गीय विदयार्थ्यांनी आवश्यक असणा-या अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव सादर करुन याचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.