दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२४ | फलटण |
जीवन शक्ती बायोएनर्जी एलएलपीतर्फे ‘नेपियर गवत (घास) परिसंवादा’चे आयोजन शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता जिंती नाका, फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल (शेती शाळा परिसर) सभागृहात केले आहे. नेपियर गवत (घास) किफायती शेतीसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राहणार आहेत.
तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. पी. सी. पटेल (निवृत्त संशोधन शास्त्रज्ञ, आनंद कृषी विद्यापीठ, गुजरात), डॉ. आरोही कुलकर्णी (बायोटेक्नॉलॉजिस्ट, पुणे) यांची उपस्थिती असणार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटणचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.