दैनिक स्थैर्य | दि. १८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे फलटण शहरात दिनांक २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान ‘ज्ञानप्रकाश यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या काळात विविध विषयांवर सुमारे १ तासाचे विनामूल्य कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तरी इच्छुकांनी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन ज्ञानप्रकाश यात्रेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्यवसाय, नोकरी, कौटुंबिक व सामाजिक ताणतणाव कमी करण्याचे उपाय ताणमुक्ती, व्यावसायिक, अधिकारी, गृहिणी इ. सर्व प्रौढांसाठी मत्सराचे दुष्परिणाम, पती, पत्नी व कुटुंबियांसाठी कौटुंबिक सुख आणि शांती, मनोधैर्यासाठी ध्यान, इच्छापूर्तीसाठी ज्योतिध्यान, मुलाचा सर्वांगीण विकास, रोगमुक्ती आणि आरोग्य, १ ते १२ वयोगटातीला मुलांच्या पालकांसाठी जन्मपूर्व संस्कार, अभ्यासयशाच्या युक्त्या शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांसाठी, तारुण्यातील महत्त्वाकांक्षा १५ ते २८ वयोगटातील तरुण व पालकांसाठी, विद्यार्थी समस्या आणि उपाय, शालेय, महाविद्यालयीन शिक्षक व पालकांसाठी मोबाईल वापराचे फायदे आणि तोटे, सर्व वयोगटांसाठी आपल्याला कार्यक्रमासाठी वरील हवा असलेला विषय, तारीख व वेळ याबाबत माहिती कळविल्यास आम्ही आपल्याकडे येऊन कार्यक्रम घेऊ.
समाजहिताच्या उद्देशाने घेतल्या जाणार्या या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी मनशक्ती साधक सुषमा ङोंगरे यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ९७६४४०२०८७ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.