दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑगस्ट २०२४ | फलटण |
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण येथील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांनी ‘एफएमडी’ या रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर आयोजित केले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जनावरांना लसीकरण करण्यात आले.
या शिबिरात आजारावरील प्रतिबंधात्मक उपायासाठी कृषीदुतांनी सांगितले की, ज्या जनावरांना ह्या आजाराची लागण झाली असेल अशा जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. आजारी जनावरांची हालचाल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी करू नये. आजारी जनावरांना त्यांची वासरे पाजू नयेत. ज्या जनावरांना आजाराची लागण झालेली आहे, त्यांना बाहेर चरण्यास नेऊ नये इ. माहीती शेतकर्यांना दिली.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य श्री. डॉ. एस. डी. निंबाळकर सर, समन्वयक प्रा. निलिमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत उदयसिंह गायकवाड, सुमित बागुल, ओंकार खेडकर, गौरव रायकर, अमितेश बोदडे, आदित्य घेवारे यांनी हे प्रात्यक्षिक पार पाडले.