नागरी संरक्षण दल व होमगार्ड मार्फत राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । मुंबई । नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य स्कुल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत 34 जिल्ह्यातील निवड केलेल्या 34 शाळा अथवा महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन 14 डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिलचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, यु एन डी पी व महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या पुढाकाराने आणि रिका इंडिया या संस्थेच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

नागरी संरक्षण दल व होमगार्ड विभागातील अधिकारी संबंधित शाळा अथवा महाविद्यालयातील शिक्षकांशी समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन मॉकड्रिल आयोजित करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची सूचना, आग विमोचन, स्थलांतर, याची प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्तीमध्ये धैर्याने संकटावर मात कशी करावी तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे बहुमोल व उपयोगी प्राथमिक प्रशिक्षण या मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!