पेट फेड इंडियाचे मुंबईत आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । मुंबई । पेट फेड इंडिया हा देशातील पाळीव प्राणी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित केला जाणारा सर्वांत मोठा पेट महोत्सव आहे. या दोन दिवसांचा महोत्सव जानेवारी २१ व २२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबईतील गोरेगाव येथील नेस्कोमध्ये होणार आहे.

कॅरी माय पेट ही कंपनी पेट फेड इंडियाची ट्रॅव्हल पार्टनर तर आहेच, शिवाय या कंपनीने पाळीव प्राण्यांच्या स्थलांतर प्रक्रियेबद्दल पालकांना शिक्षित करण्यासाठी अनेकविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. पाळीव प्राण्यांच्या स्थलांतरासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहतूकीच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल यात माहिती दिली जाणार आहे. तसेच पालकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. पाळीव प्राण्यांच्या पालकांना कंपनी देत असलेल्या सेवेची कल्पना यावी म्हणून ठेवलेले मिनिएचर विमान त्यांच्या स्टॉलवरील प्रमुख आकर्षण असेल.

नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या पेट फेड बेंगळुरूमध्ये व डिसेंबर महिन्यात झालेल्या पेट फेड दिल्लीमध्ये कॅरी माय पेटचा सहभाग यशस्वी ठरला होता. दोन्ही शहरांमध्ये कॅरी माय पेटच्या स्टॉलला ७०००हून अधिक अभ्यागतांनी भेट दिली. पेट फेड मुंबईसाठीही कंपनीने त्याच प्रकारच्या मॉडेलचे नियोजन केले आहे; यामध्ये प्रवासाच्या प्रक्रियेचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रात्यक्षिक दाखवले जाते. सहभागी अभ्यागतांना मॉक बोर्डिंग पास देणे, पाळीव प्राण्यांना लुटुपुटूचे ‘फिट-टू-फ्लाय’ प्रमाणपत्र देणे आदींच्या माध्यमातून ही प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली जाते आणि अखेरीस पाळीव प्राण्यासोबत विमानात जाण्यातून त्यांना पाळीव प्राण्याच्या स्थलांतराचा खराखुरा अनुभव दिला जातो.

कॅरी माय पेट या दिल्लीस्थित पाळीव प्राणी वाहतूक ब्रॅण्डने ६०००हून पेट रिलोकेशन्स पूर्ण केली आहेत. यांमध्ये ७२०० पाळीव प्राण्यांचे देशांतर्गत तसेच ३०हून अधिक देशांत जागतिक स्थलांतर करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!