दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२२ । मुंबई । खाजगीकरण, उदात्तीकरण आणि कंत्राटीकरण या योजनांच्या माध्यमातून देशातील लाखो उद्योगधंदे बंद झाले असल्याने तरुण वर्गात बेकारीची समस्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यातच महागाई शिगेला पोहोचल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईच्या खाईत भरडला जात आहेत व यातच तरुणांची आर्थिक कोंडी होत आहे त्यामुळेच तरुण तरुणी वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यास अनास्था दाखवीत आहेत त्यामुळे लग्नाची वयोमर्यादा टळत आहे, ह्या एकूण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बौद्धजन पंचायत समितीच्या विवाह मंडळाच्या माध्यमाने बौद्ध तरुण तरुणींना वैवाहिक जीवनात प्रवेश करून वैवाहिक जीवन सुखसमृद्धीने जावो म्हणून विवाह मंडळाचे सभासद शुल्क रु. ३००/- नाममात्र भरून अल्पखर्चात बौद्ध वधू वरांना लग्नाच्या पवित्र बंधनात बांधण्याचे मौलिक कार्य बौद्धजन पंचायत समितीद्वारे करण्यात येते.
सालाबादप्रमाणे याही वर्षी बौद्धधर्मीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठीक १० वाजता ते दुपारी ४ या वेळेत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई -१२ या ठिकाणी करण्यात आले आहे.
सदर मेळाव्याचे उद्घाटन कार्याध्यक्ष मा. लक्ष्मण भगत यांच्या शुभहस्ते होणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपसभापती मा. विनोदजी मोरे मार्गदर्शन करणार आहेत, त्याचबरोबर माजी कार्याध्यक्ष व विश्वस्त मा. किशोरजी मोरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे करणार असून, प्रास्तविक विवाह मंडळ अध्यक्ष तुकाराम घाडगे करतील, आभारप्रदर्शन विवाह मंडळ चिटणीस अतुल साळवी करतील, सदर कार्यक्रमास उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमणी तांबे, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस रवींद्र पवार, विठ्ठल जाधव, प्रकाश करूळकर आणि व्यवस्थापन मंडळाचे मान्यवर, विविध समित्या, समित्यांचे प्रमुख, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत, तरी विवाहोच्छूक वधू-वरांच्या पालकांनी आपल्या मुला-मुलीसह उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवावी असे आव्हान बौद्धजन पंचायत समिती आणि विवाह मंडळाच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात जनसंपर्क प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष रमेश जाधव व चिटणीस विश्वास मोहिते यांनी केले आहे.