दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्री संत शिरोमणी सावता महाराज समाधी सोहळा सप्ताह व लायन श्री. दादासो आप्पाजी शेंडे (अध्यक्ष, श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट, फलटण) यांच्या ९१ व्या वर्षपूर्ती समारोहनिमित्त श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट फलटण, लायन्स क्लब फलटण, फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड सेंटर फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत श्री संत सावता महाराज मंदिर, पहिला मजला, फलटण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री संत सावतामाळी यांची पुण्यतिथी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. सप्ताह काळात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत सावतामाळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लायन श्री. दादासोा शेंडे यांच्या ९१ व्या वर्षपूर्तीनिमित्त श्री संत सावतामाळी महाराज मंदिर ट्रस्ट फलटण, लायन्स क्लब फलटण व फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड सेंटर फलटण यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन लायन दादासोा शेंडे, अध्यक्ष जगदिश करवा व फलटण मेडिकल फौंडेशन ब्लड सेंटरचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत करवा यांनी केले आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)