
दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । फलटण । येथील राजे गटाचे युवा कार्यकर्ते पै.पप्पुभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त पप्पूभाई शेख मित्र मंडळाच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदरचे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. या रक्तदान शिबीरात सहभागी होणार्या रक्तदात्यांना प्रोत्साहनपर भेट वस्तू देण्यात येणार असून शिबीरास रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
शिबीरात सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी गणेश उर्फ बंटी हाडके, केदार कर्वे, साजिद डांगे, अबु डांगे, हैदर शेख, अन्सर मणेर, बाळासाहेब भट्टड, अजिंक्य राऊत यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन पप्पूभाई शेख मित्र परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.