
दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । पाटोदा । श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाटच्या बंकटस्वामी विद्यालयात दि.13/8/2022 ते दि.15/8/2022 या तिन्ही दिवस ध्वजारोहण करण्यात आले. तसेच “हर घर तिरंगा” निमित्त एक दिवस प्रभात फेरी काढण्यात आली.विविध कार्यक्रम चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा देशभक्तीपर गीते स्पर्धा घेण्यात आल्या.
पहिल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी शाळेतील ज्येष्ठ सेवक श्री बाबुराव कानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आणि 15 ऑगस्ट या दिवशी शालेय समितीचे सदस्य माननीय श्री मधुकरराव गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,गावातील आजी-माजी सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,तलाठी साहेब ,ग्रामसेवक साहेब ,पोलीस पाटील, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका रिंगणे मॅडम ,अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच शालेय पोषण आहाराच्या मदतनीस , गावातील आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिक महिलावर्ग उपस्थित होता.