दैनिक स्थैर्य | दि. २८ सप्टेंबर २०२४| फलटण |
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त लोणंद येथील रयत संकुल लोणंदच्या वतीने सोमवार, दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (मुलींचे) लोणंद येथील प्रांगणात आयोजित केला आहे. या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत, इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. श्रीमंत कोकाटे व भारतीय क्रिकेट नियमक मंडळ उपसंचालक, सहाय्यक पोलीस उपायुक्त (से.नि.) रवींद्र डोईफोडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था, सातारा सहसचिव (उ.शि.), प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे असणार आहेत. यावेळी माजी सभापती, समाजकल्याण जि. प. सातारा आनंदराव शेळके-पाटील, जनरल बॉडी सदस्य, र. शि. सं. सातारा व आजीव सदस्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई मिलिंद माने, ज्येष्ठ नेत्र चिकित्सक लोणंद डॉ. अजित वर्धमाने, बालरोगतज्ज्ञ अनिल राजे निंबाळकर, भागिदारी संस्था (से. नि.) निबंधक अॅड. सुरेंद्र बोडरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज (मुलींचे) लोणंदच्या प्राचार्या सौ. सुनंदा नेवसे, प्राचार्य मालोजीराजे विद्यालय व ज्युनि. कॉलेज, लोणंद व सदस्य समन्वय समिती, र. शि. सं. सातारा चंद्रकांत जाधव उपस्थित असणार आहेत.
सर्व विद्यालय व महाविद्यालय विकास समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थिनी, रयत संकुल, लोणंद आणि लोणंद पंचक्रोशीतील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी या जयंती सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. प्राचार्य शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.