बौद्धजन पंचायत समितीच्या ८२व्या वर्धापन दिनाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२३ । मुंबई । शोषित, पीडित, वंचित बौद्ध बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक संस्था स्थापन केल्या त्यातील कोकणस्थ बांधवांची हक्काची संस्थ म्हणजे बौद्धजन पंचायत समिती; सदर समितीचा ८२वर्धापन दिन गुरुवार दि. २५ मे २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता, तसेच महासुर्याची सावली, कोट्यवधींची माऊली महामाता रमाई यांचा ८८ वा स्मृतिदिन दि. २७ मे २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वाजता आदरणीय सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जेरबाई वाडिया मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई -१२ इथे आयोजित करण्यात आला आहे

सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच. आर. पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ हे वक्ते म्हणून आपले मनोगत मांडतील.

कोकणस्थ बौद्ध बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक जडणघडणीत बौद्धजन पंचायत समितीने मोलाचे योगदान दिले आहे तरी सर्व व्यवस्थापक मंडळ, चिटणीस, बौद्धाचार्य, शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी संस्थेद्वारे काढलेल्या परिपत्रकात केले आहे.


Back to top button
Don`t copy text!