तेजज्ञान फौंडेशन (Happy Thoughts) च्या वतीने 25 तास अखंड ध्यान बैठकीचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १५ नोव्हेंबर २०२४ | फलटण | हॅप्पी थॉट्स तेजज्ञान फौंडेशनला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निम्मित स्वतःची आणि विश्वाची चेतना, सकारात्मकता, विश्वशांती वाढवण्यासाठी तेजज्ञान फौंडेशन (Happy Thoughts) आयोजित करत आहे. 25 तास अखंड ध्यान बैठक (Flame of Unbroken Meditation) आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; हे आयोजन तेजज्ञान फौंडेशनच्या देशातील 125+ सेंटर वर केलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून फलटण मध्ये 16 नोव्हेंबर 2024 सकाळी 10.10 ते 17 नोव्हेंबर 2024 सकाळी 11.11 पर्यंत 25 तास अखंड ध्यान बैठक ऑनलाईन – ऑफलाईन आयोजित केली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे कि; या बैठकमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार 10-20-30 मिनिट जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आपण ध्यान करून विश्वाशांती साठी निम्मित बनू शकता. ज्ञान ध्यान केंद्र बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, कोळकी, फलटण येथे बैठक संपन्न होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!