दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२३ । सातारा ।
न्याय आपले दारी या नाविन्यपूर्ण संकल्पेनुसार संपूर्ण जिल्ह्यात दि. 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 अखेर मोबाईल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीकरिता मुंबई उच्च न्यायालय यांच्या कडून मोबाईल व्हॅनची सेवा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल लोक अदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख बी.डी. खटावकर, निवृत्त न्यायाधीश हे पाहणार आहेत.
लोकन्यायालयाचे कामकाज मोबाईल व्हॅनमध्ये चालणार असून गावपातळीवरील सर्व व्यक्तींकरिता आपली प्रलंबित दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील, तसेच सर्व बँका, मोबाईल कंपन्या, विद्यूत वितरण कंपनी यांची वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील.
यानुसार प्रत्येक तालुक्यामध्येही एक लोकअदालत आणि एक विधी साक्षरता शिबीर पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेले आहे.
लोकअदालतीचे दिनांक व ठिकाण: दि. 3 ऑगस्ट रोजी करहर ता. जावली, दि. 5 ऑगस्ट रोजी पाचगणी ता. महाबळेश्वर, दि. 8 ऑगस्ट रोजी खानापूर ता. वाई, दि. 10 ऑगस्ट रोजी पळशी ता. खंडाळा, दि. 14 ऑगस्ट रोजी राजाळे ता. फलटण, दि.17 ऑगस्ट रोजी गोंदावले बु. ता. माण, दि. 19 ऑगस्ट रोजी भालवाडी ता. माण, दि. 22 ऑगस्ट रोजी वडूज ता. खटाव, दि. 24 ऑगस्ट रोजी कोरेगांव ता.कोरेगांव, दि. 29 ऑगस्ट रोजी मल्हारपेठ ता. पाटण, दि. 30 ऑगस्ट रोजी उंब्रज ता. कराड.
जनजागृती साक्षरता शिबीर कार्यक्रमाचा दिनांक पुढीलप्रमाणे: दि. 4 ऑगस्ट रोजी कुसुंबी ता. जावली, दि. 7 ऑगस्ट रोजी भोसे ता. महाबळेश्वर, दि. 9 ऑगस्ट रोजी पाचवड ता. वाई, 11 ऑगस्ट रोजी पळशी ता. खंडाळा, दि.16 ऑगस्ट रोजी विडणी ता. फलटण, दि.18 ऑगस्ट रोजी पांढरवाडी ता. माण, दि. 21 ऑगस्ट रोजी जांभुळणी ता.माण, दि. 23 ऑगस्ट रोजी गणेशवाडी ता. खटाव, दि. 25 ऑगस्ट रोजी एकसळ ता. कोरेगांव, 29 ऑगस्ट रोजी मल्हारपेठ ता. पाटण, दि. 31 ऑगस्ट रोजी उंब्रज ता.कराड.
तरी जिल्ह्यातील सर्व पक्षकार, विधिज्ञ आणि सर्व वित्तीय संस्था, मोबाईल कंपन्या यांनी या मोबाईल लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एस.एस.अडकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांनी केले आहे.