दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2024 | फलटण | मॅग फाउंडेशन व माऊली फाउंडेशन संचालित “जनसेवा डायग्नोस्टीक सेंटर, फलटण” आणि “फलटण वकील संघ फलटण” यांचे संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. श्री स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवादिन आणि राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंतीचे औचित्य साधून फलटण ब्लड बँकेचे सहयोगाने आयोजन केलेले आहे. शुक्रवार दि.12 जानेवारी रोजी जनसेवा डायग्नोसिस सेंटर सकाळी 09 वाजून 30 मिनिटांनी ते दुपारी 4 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.
सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन फलटण दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. आर. डी. भुयारकर तसेच न्यायमूर्ती सौ. एस. डी. साबळे, पी. एच. पाटील, एस. एन. थापेकर, सौ. एस. आर. बडवे व सौ. के. आर. पाटील यांचे शुभहस्ते होणार आहे.
तरी सर्व तमाम जनतेस आवाहन करण्यात येते की, या रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे; तसेच जास्तीत जास्त जणांनी स्वतः रक्तदान करावे व इतरांनाही रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करून या शिबीरात जास्तीत जास्त रक्त संकलित करण्याच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे; अशी सर्वांना विनंती व आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य असुन या कार्यात आपण स्वतः रक्तदान करून सहभागी व्हावे आणि इतरांनाही रक्तदान करणेस प्रेरित करावे.