
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२४ | फलटण |
‘पी. एन. गाडगीळ अॅण्ड सन्स’तर्फे बुधवार, दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रतापगडाच्या पायथ्यापाशी घडलेली शिवप्रतापाची रोमांचकारी गोष्ट ‘अफजलखान वध’ या कार्यक्रमाचे फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ‘गोष्ट इथे संपत नाही…’च्या माध्यमातून सारंग भोईरकर आणि सारंग मांडके हे सादर करणार आहेत.
