ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक वापरण्यास सुट देण्याबाबतचे आदेश निर्गमित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सण व उत्सवांच्या दिवसांसाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक/ध्वनीवर्धक सकाळी 6 वाजल्या पासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार दि. 19 फेब्रुवारी 2023 शिवजयंती, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्रदिन/कामगार दिन, 20 सप्टेंबर गणेशोत्सवाचा दुसरा दिवस, 23 सप्टेंबर गणेशोत्सवाचा पाचवा दिवस(गौरी विसर्जन), 27 सप्टेंबर गणेशोत्सवाचा नववा दिवस, 28सप्टेंबर गणेशोत्सव (अनंत चतुर्दशी) व ईद-ए-मिलाद,  23 ऑक्टोबर   नवरात्र अष्टमी (खंडेनवमी), 24 ऑक्टोबर विजयादशमी (दसरा), 12 नोव्हेंबर  दिपावली (लक्ष्मीपुजन), 25 डिसेंबर  ख्रिसमस (नाताळ), 31 डिसेंबर 2023 या दिवसांसाठी सुट देण्यात आली आहे.  तसेच जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार सुट  दिली जाईल.


Back to top button
Don`t copy text!