कोकण रेल्वे मार्ग विस्तारीकरणाला विरोध; पहाटे रुळावर ठिय्या आंदोलन


 

स्थैर्य, मडगाव, दि.२: रेल्वे
दुपदरीकरणाला विरोध करणा-या हजारो आंदोलकांनी पहाटे ५ वाजेपर्यंत चांदर
येथे रेल्वे रुळावर ठाण मांडून आपल्या एकीचे प्रदर्शन केले. आंदोलकांचा हा
रुद्रावतार पाहून रेल्वेने शेवटी आपले नियोजित काम बंद ठेवणेच पसंत केले.

रविवारी रात्री १२ पासून सकाळी ५
वाजेपर्यंत रेल्वे मार्गाच्या विस्ताराचे काम रेल्वेने हाती घेतले होते.
मात्र हा विस्तार कोळसा वाहतुकीसाठी असल्याचा दावा करून ‘गोयांत कोळसो
नाका’ या संघटनेने शनिवारी या विस्ताराला विरोध करण्यासाठी चलो चांदरची हाक
दिली होती.

या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी रात्री
हजारोंच्या संख्येने लोक चांदर येथे जमले. चांदर चर्च पासून लोकांनी
मेणबत्ती मोर्चा काढला. यावेळी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
काही आंदोलक ढोल घेऊनही या आंदोलनात सामील झाले होते. काँग्रेस, गोवा
फॉरवर्ड आणि आप या राजकीय पक्षानीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता.
त्या पक्षाचे नेते आणि कार्यकत्यार्नीही या आंदोलनात भाग घेतला होता. या
आंदोलनाचे नेते अभिजित प्रभुदेसाई यांनी हा प्रतिसाद अभूतपूर्व असून आता
तरी सरकारने लोकभावनेची कदर करून कोळसा वाहतुकीला पोषक असलेले सर्व प्रकल्प
गुंडाळून ठेवावेत, असे आवाहन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!