दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । मराठा महासंघाचे नेते शशिकांत पवार यांच्या निधनानं मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शशिकांत पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने मराठा समाजाच्या हितासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे, अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.