संधी वारंवार मागायची नसते आणि ती द्यायचीही नसते – शरद पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२३ | सातारा |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलीच नसल्याचे वक्तव्य करून सगळ्यांना संभ्रमात टाकले असताना दुपारनंतर दहिवडी येथे बोलताना अजित पवार यांना यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी नाही, अशी भूमिका मांडली आहे. संधी वारंवार मागायची नसते आणि ती द्यायचीही नसते, अशा शब्दात पवार यांनी अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहेत.

शरद पवार दहिवडी येथे म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी पहाटेच्या वेळी दोघांचा शपथविधी झाला होता. त्यामध्ये आमचे एक सहकारी सहभागी झाले होते. मात्र, एखाद्याने एक-दोन वेळा वेगळा मार्ग पत्करला आणि त्यानंतर तो दुरूस्त केला तर सुधारण्याची संधी देता येते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असाच विचार करून पहाटेच्या शपथविधीत सहभागी झालेल्यांना पुन्हा सामावून घेतले होते. मात्र, त्याच त्याच चुका वारंवार करणार्‍यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकत नाही, असेही पवार म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!