तळ्यातील देवीचे मंदिर भक्तांसाठी खुले करा; नगरसेवक अशोकराव जाधव यांची मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहरामधील तळ्यातील देवी म्हणजे आई तुळजाभवानीचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे. याबाबत नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे लेखी मागणी केलेली आहे.

आज घटस्थापनेमुळे फलटण शहरासह तालुक्यातील भक्तांना आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची आस लागलेली आहे. त्यामुळे संबंधित देवस्थान समितीने तातडीने तळ्यातील देवी म्हणजेच आई तुळजाभवानीचे मंदिर दर्शनासाठी खुले करावे. तालुक्यातील भक्तांसाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः लक्ष घालून मंदिर खुले करावे, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!