दैनिक स्थैर्य | दि. 20 जुलै 2024 | फलटण | राजाळे गावामधील जानाई मंदिर ते सरडेकडे जाणारा जुना रस्ता खुला करावा; अशी मागणी राजाळे गावातील ग्रामस्थांनी दि. १० जुन 2022 रोजी केली होती. याची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही म्हणून राजाळे गावचे रहिवासी निखिल निंबाळकर यांनी याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासनाच्या जागेत इमारत बांधून शासनाचा कर बुडवला आहे. ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नसताना ग्रामपंचायतीने ठराव करून रस्ता बंद केला आहे व त्यात इमारत बांधकामाची परवानगी दिली आहे. याबाबत राजाळे गावचे रहिवासी असलेले माजी सनदी अधिकारी यांच्या दबावाखाली येऊन फलटण प्रशासन अतिक्रमण काढत नसल्याचा आरोप सुद्धा तक्रारी अर्जामध्ये निखिल निंबाळकर यांनी केला आहे.