महात्मा गांधी यांचे सहिष्णुता व सामंजस्याचे विचारच देश पुढे नेतील – डॉ. शिवाजीराव पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । महात्मा गांधी यांचे सहिष्णुता आणि सौहार्दपूर्णतेचे व सामंजस्य राखण्याचे विचार देश पुढे नेण्यास मदत करतील असे विचार छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.  शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सातारा येथील दूर शिक्षण विभागीय केंद्राच्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्मृतीशेष लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम सातारचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला व डॉ शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके होते. त्यावेळी डॉ. शिवाजीराव पाटील बोलत होते शिवाजीराव पाटील यांनी यावेळी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या देशी उभारणीच्या  कार्याची माहिती दिली.

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या नैतिकता चारित्र्य विचार संपन्नता याबद्दल गौरवोद्गार काढले.  कवी प्रमोद कोपर्डे यांनी दोन कविता सादर सादर करून अभिवादन केले.

सुत्रसंचलन डॉ निलकंठ लोखंडे यांनी केले. आभार सातारा दुर शिक्षण विभागिय केंद्राचे समन्वयक  डॉ. सुर्यकांत गायकवाड यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ ,  दिनकर झिंब्रे , प्रा. सुनील गायकवाड ,  प्रा. डॉ.विकास यलमार ,  डॉ.विक्रम पाटील ,  प्रा. प्रशांत प्रक्षाळे ,  प्रा भास्करराव कदम  उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!