
दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । वाई । वाई येथील प्राध्यापक कॉलनीत राहणाऱ्या परिचारिकेच्या मोबाईलवर हेल्पलाईनवरून अज्ञात व्यक्तीने फोन करून क्रेडिट कार्डचा नंबर मागवून घेऊन बँक खात्यातून 1 लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
वाई पोलिसानी दिलेली माहिती अशी की, शोभा दीपक बहाले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या पुणे येथील कोंढवा हॉस्पिटलमध्ये परिचारिका आहेत. त्यांना दि.18फेब्रुवारी 2022 रोजी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान फोन आला. हेल्पलाईन वरून बोलत आहे असा विश्वास दाखवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्डचा नंबर मागवून घेतला. अन क्षणात त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून सुमारे 1 लाख 92 हजार 33 रुपये काढून घेतले असून याचा तपास महिला पोलीस हवालदार शिरतोडे या करत आहेत.