स्थैर्य, सातारा, दि. 13 : सदर बझारमध्ये शुक्रवारी रात्री एकावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की रोहित शामराव रणदिवे (वय २६) रा. कोयना सोसायटी, सदर बझार, सातारा याच्यावर शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जय मल्हार कॉलनी, सदर बझार येथे योगेश कांबळे रा. गोसावी गल्ली, सदर बझार याने ब्लेडने वार केल्यामुळे त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.