
दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । सातारा । येथील पोवई नाका परिसरातून पती बेपत्ता झाल्याची तक्रार पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ सप्टेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास धनंजय बापूराव कार्वे वय ३३ रा. स्वरांजली अपार्टमेंट, शिवाजीनगर, शाहूपुरी, सातारा त्यांचे मित्र राहुल केशव लोहार यांना मित्रासोबत जेवायला जातो असे सांगून पोवई नाका येथून निघून गेले, ते अद्याप प्रयत्न आल्याची तक्रार पत्नी आसावरी धनंजय कार्वे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.