
दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । सातारा । विनयभंगासह खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी परिसरातील एका अपार्टमेंट मध्ये भाड्याच्या घरात राहणारी अल्पवयीन मुलगी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर अभ्यास करत होती. याचवेळी तेथीलच राहणारा विवेक नरहरी शेट्टी वय 23 याने त्या मुलीस लग्नाची मागणी घातली. परंतु मुलीने नकार देताच त्याने मुलीला जवळ ओढून तिच्या गळ्यावर, पोटात चाकूने वार केला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.