दैनिक स्थैर्य | दि. ३ जून २०२३ | फलटण |
फलटणमधील डीप माइंड चेस अकॅडमीने महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या, रविवार दि. ४ जून २०२३ रोजी एकदिवसीय बुध्दीबळ स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सहस्त्रकृट दिगंबर जैन धर्मशाळा, दगडी पूल, शुक्रवार पेठ, फलटण येथे संपन्न होणार आहे.
ही बुध्दीबळ स्पर्धा तीन गटात खेळवली जाणार असून खुला गट, १५ वर्षांखालील व १० वर्षांखालील वयोगटासाठी असे ते तीन गट आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश फी ३००/- रुपये असून १५ वर्षांखालील खेळाडूंसाठी प्रवेश फी २००/- रुपये राहील. ही स्पर्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचारमंच, चौधरवाडी यांच्या सौजन्याने आयोजित केली असून सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
या बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन रविवार, ४ जून रोजी सकाळी ११.०० वाजता आ. दीपकराव चव्हाण व चौधरवाडीचे सरपंच श्री. तुकाराम कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे.
बक्षीस वितरण ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी कोषाध्यक्ष श्री. राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी दिपंकर कांबळे (८७९३२९४२९५), श्रेयस कांबळे (९५७९५५८९५०), अक्षय कांबळे (९६८९३६२९६७) व शार्दूल तपासे (९९६०५३०२०७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.