दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून जैन सोशल ग्रुप फलटण व फिरती विज्ञान प्रयोगशाळा यांचेकडून जिल्हा परिषद शाळा काळज व विठ्ठलवाडी येथील विद्यार्थ्यांना फळरोपांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याने हे झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे त्यांना आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सविता दोशी, सचिव प्रीतम शहा (वडूजकर), जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष व श्रीराम बझारचे संचालक श्री. तुषार गांधी, संचालक डॉ. मिलिंद दोशी, मेंबरशीप ग्रोथ चेअरमन डॉ. अशोक व्होरा व जैन सोशल ग्रुप पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षां व मुधोजी महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका सौ. माधुरी दाणी मॅडम, फिरती विज्ञान प्रयोग शाळेचे संचालक श्री. पोपट बर्गे व श्री. सचिन पंडित सर यांचे सहकार्य लाभले.
यावेळी जैन सोशल ग्रुपचे सचिव प्रीतम वडूजकर यांनी विद्यार्थ्यांना वृक्षलागवड व संवर्धन याचे महत्त्व सांगून एक झाड दत्तक घेऊन त्याची निगा राखावी, असे आवाहन केले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद शाळा काळज व विठ्ठलवाडी यांच्याकडून धन्यवाद देण्यात आले.