दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
निंबळक, ता. फलटण गावच्या हद्दीत साठेफाटा रस्त्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मटका जुगार घेताना सतीश लहू जाधव (राहणार गुणवरे, ता. फलटण) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यावेळी पोलिसांनी संशयित सतीश जाधव याच्याकडून मटका घेण्याच्या साहित्यासह १२००/-रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.