सर्वात जुनी शाळा प्रतापसिंह हायस्कूल हे कोणत्या बेसवर रयत शिक्षण संस्थेला जोडणार?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा जिल्हा परिषदेचे सर्वात जुनी शाळा प्रतापसिंह हायस्कूल हे कोणत्या बेसवर  रयत शिक्षण संस्थेला जोडणार असा सवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला. दरम्यान, शेती पंपाच्या कनेक्शनसाठी फिडर दिले जात नाहीत, त्यावरुन कृषी समितीच्या सभेत सदस्यांनी कोंडी केली. सभेनंतर कृषी सभापती मंगेश धुमाळ हे पाऊस व पेरणीची आकडेवारी समजून घेण्यात व्यस्त होते.

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शिक्षण व अर्थ समितीची सभा सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तर कृषी व पशुसंवर्धन समितीची सभा ही कृषी समितीची सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला अरुण गोरे, मनोज घोरपडे, डॉ. भारती पोळ, मनोज पवार, कविता जगदाळे, रेखा घार्गे, अंजना कदम, जयश्री गिरी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. कृषी समितीच्या सभेत कराडच्या सदस्यांनी महावितरण कंपनी शेतकऱयांची किती पिळवणूक करत आहे. गेल्या वर्षी महापुरात मोटरी गेल्या. त्या शेतकऱयांना विद्युत पंप बसवण्यासाठी कनेक्शन दिली जात नाही. पुर्वी एकेका फिडरवर अनेक कनेक्शन असायची. परंतु आता कनेक्शन दिली जात नाहीत. हा का उलटा कारभार असा सवाल उपस्थित केला. तर सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली गेल्यावर्षीची झाडे कुठे आहेत असाही सवाल उपस्थित करुन कोंडी केली. त्यानंतर पशुसंवर्धनची सभा झाली. त्या सभेपूर्वी सभापती मंगेश धुमाळ हे आकडेमोड समजून घेण्यात व्यस्त होते.

शिक्षण समितीच्या सभेत प्रतापसिंह हायस्कूल नेमके कोणत्या बेसवर रयतला जोडले जाणार आहे?, काय आधार आहे, जिल्हा परिषदेचा अधिकार राहिला पाहिजे, असा सवाल करताच सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी उद्या रयत शिक्षण संस्थेची बैठक आहे. त्यामध्ये सचिवांच्यासमोर मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे, असे सांगितले. निधी का खर्च झाला नाही त्यावरुन छेडले. ओपन जीमचे काय झाले असे छेडले असता सभापतींनी शाळेत साहित्य पोहचले आहे, असे सांगितले. शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला असता शिक्षणाधिकाऱयांनी जीआर दाखवला. अरुण गोरे यांनी शाळेतील मुलांना मास्क आणि सॅनिटायझरसाठी 25 लाखची तरतूद करण्याची मागणी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!