दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबाबांचा १८४ वा प्रगट दिन व रथोत्सव सोहळा शनिवार, दि. १२ ऑक्टोबर २०२४ या विजयादशमी दसर्या दिवशी सायंकाळी ६.०० वाजता प्रारंभ होणार आहे. यावेळी श्री सद्गुरू हरिबुवा साधु महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते रथपूजन होणार आहे.
त्यानंतर रविवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते १० वाजता ’ॐ दत्त चिले ॐ’ भजनी मंडळ भजन सेवा व भारुड कार्यक्रम होईल.
सोमवार दि. १४/१०/२०२४ रोजी
- सकाळी ६ वाजता – महाभिषेक
- सकाळी ८ ते ११ – श्री हरिचरित्र वाचन – व्यासपीठ- श्री. चंद्रकांत नरहर वादे (काका)
- दुपारी १२ ते २ – पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळाची भजनसेवा
- दुपारी २ ते ५ – भजन स्पर्धा (कै. विशाल भोईटे यांचे स्मरणार्थ)
- सायं. ५ ते ६ – प्रवचन
- सायं. ८ ते ११ – प्र.ब्र. १०८ शिवाचार्य महादेव वाईकर महाराज, वाई मठाधिपती यांची प्रवचन व भजन सेवा
मंगळवार, दि. १५/१०/२०२४ रोजी श्री सद्गुरू हरिबाबा महाराज यांचा प्रगट दिन असणार आहे. या दिवशी
- सकाळी ६ वा. – महाभिषेक
- सकाळी १० वा १० मि. – ‘श्रीं’च्या रथाचे प्रस्थान मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा.अध्यक्ष,जि.प.सातारा यांचे हस्ते होईल.
- सायं. ७ वा – आरती व महाप्रसाद
सर्व विश्वस्तांच्या व भाविकांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणेस सुरुवात होणार आहे. ‘श्रीं’च्या मंदिरापासूर सुरू होऊन मलठणनंतर फलटण शहरातून उघडा मारुती मंदिर, शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद, उपळेकर काका मंदिर, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट, बुरूड गल्ली ते श्रींचे मंदिर अशी नियोजित आहे.
या सर्व कार्यक्रमांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सद्गुरू हरिबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट व श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ यांनी केले आहे.