स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री छत्रपती शाहू हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । बारामती । रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य माननीय श्री सदाशिव बापू सातव यांच्या मार्गदर्शनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी. एन. पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांचे संचलन होऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अंतर्गत रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन उपशिक्षिका सौ. तृप्ती कांबळे, सौ सुनिता कोकरे ,सौ अलका चौधर उपशिक्षक श्री.रिमाजी मारकड व इयत्ता दहावी फ मधील मुलींनी केले प्रत्येक रांगोळीतून अमृत महोत्सवानिमित्त संदेश देण्यात आला. या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मा. श्री निलेश (अण्णा) टिळेकर अध्यक्ष महात्मा फुले फाउंडेशन, मा. मुख्याध्यापक श्री. बी. एन. पवार साहेब शिक्षक प्रतिनिधी श्री. जी.आर. तावरे सर आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच उपशिक्षिका सौ.सुनिता कोकरे यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारत याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली मा. श्री निलेश( अण्णा) टिळेकर यांच्यामार्फत सर्व शिक्षक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करणार आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख सुजित जाधव सर यांनी केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!